ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुलुंड पूर्वेकडील मतदान केंद्र बाहेर गोंधळ; भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 01:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुलुंड पूर्वेकडील मतदान केंद्र बाहेर गोंधळ; भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 

शहर : मुंबई

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मुलुंड पूर्वेकडील भागात असलेल्या होली एन्जल स्कूल येथील मतदान केंद्रात आज सकाळी काही काळ गोंधळ उडाल्याची घटना घडली. होली एन्जल स्कूल मतदान केंद्रातील ईव्हीएमवर भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावण्यात आल्याचा प्रकार मतदाराच्या निदर्शनास आला. त्यानंतर मतदारांनी शंका उपस्थित करत मतदान केंद्रा बाहेर गोंधळ घातला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी ईव्हीएम बदलण्याची मागणी केली. त्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांकडून मतदान केंद्रावर दुसरे ईव्हीएम लावण्यात आले आणि मतदान पूर्ववत सुरु झाले. या गोंधळामुळे या मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया तासभर बंद होती.
ईशान्य मुंबईत भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिले आहे. या मतदार संघात मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजपा आपली जागा राखतं का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014 साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या.

मागे

साक्षी महाराजांनी मोडली रांग; मतदार संतप्त
साक्षी महाराजांनी मोडली रांग; मतदार संतप्त

सर्वत्र लोकसभा निवडणूकीचे मतदान सुरू आहे. भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी....

अधिक वाचा

पुढे  

समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीत नाही; भुजबळ संतप्त
समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीत नाही; भुजबळ संतप्त

छगळ भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुं....

Read more