ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्राचा एकात्मिक जल आराखडा तयार - गिरीष महाजन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 10:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्राचा एकात्मिक जल आराखडा तयार - गिरीष महाजन

शहर : मुंबई

राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रिकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

गोदावरीकृष्णातापीनर्मदापश्चिम वाहिनी नद्या व महानदी या सहा नदी खोऱ्यांचा एकात्मिक जलआराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नदी खोऱ्यांमध्येनदी खोरे अभिकरणांचे गठण करण्यात येईल. जलसंपदा विकास व व्यवस्थापन धोरण आखण्यात येईल. सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे दूषित पाण्याचे शुध्दीकरण केले जाईल. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले जाईल. भूगर्भीय सपाट खोऱ्यात खोल जमिनीसाठी ड्रोनेज तयार केले जाईलपाणलोट क्षेत्र विकासाच्या कामामध्ये लाभधारकांना सहभागी करून प्रशिक्षण दिले जाईल. गाळपेर क्षेत्राचा बृहत आराखडा तयार केला जाईल.

शासनाने ‘व्हिजन २०३० डॉक्यूमेंट’ निती आयोगाकडे सादर केले आहे. याच्याशी सुसंगत प्रारूप आराखड्यातील शिफारशी टप्याटप्याने सन २०१९ ते २०३० या कालावधीत विभागाकडून राबविल्या जातील, असेही श्री.महाजन यांनी सांगितले.

मागे

पाकने भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मसुदला गुपचुप सोडले
पाकने भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मसुदला गुपचुप सोडले

जम्मू कश्मीर मधून 370 कलम भारताने हटविल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. या मुद....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या 23 नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान
पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या 23 नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागर....

Read more