By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 02:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मध्यप्रदेशात सत्तासंघर्ष सुरु आहे. सोमवारी भाजप आमदारांना पुन्हा एकदा विमानतळावरुन परतावं लागलं आहे. राज्यपाल लालजी टंडन यांच्या अभिभाषणाने मध्यप्रदेश विधानसभेचं सत्र सुरु झालं. पण त्यानंतर लगेचच अध्यक्षांनी कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित केल्याने भाजपची बहुमत सिद्ध करण्याची मागणी मागे पडली. आज मंगळवारी विधानसभेत मुख्य़मंत्री कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
राज्यपालांची १७ मार्चची डेडलाईन
राज्यपालांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र पाठवत १७ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर भाजप आमदार पुन्हा विमानतळावरुन माघारी आले. पक्षाने आपल्या आमदारांना दिल्ली पाठवण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे आजच्या घडामोडींवर सगळ्यांचं लक्ष असेल.
मध्यप्रदेशची सत्ता कोणाला मिळणार आता याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेसचे १६ बंडखोर आमदार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक २२ आमदारांनी बंडखोरी करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामध्ये ६ जणांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. १६ आमदारांचा राजीनामा अजून मंजूर झालेला नाही.
विधानसभेत सध्या २३० पैकी २ स्थान रिक्त आहेत. ६ आमदारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेसचे १०८, भाजपचे १०७, बसपाचे २, सपाचा १ आणि ४ अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा पाठवल्यानंतर काँग्रेसकडे आता ९२ आमदार उरले आहेत. सपा, बसपा आणि अपक्ष आमदारांना पकडून त्यांची संख्या ९९ होते.
१७ मार्चला जर कमलनाथ सरकार बहुमत सिद्ध नाही करु शकली तर हे सरकार अल्पमतात असल्याचं मानलं जाईल असं राज्यपालांनी म्हटलं आहे. त्यानंतर कमलनाथ यांनी संध्याकाळी राजभवन येथे पुन्हा राज्यपालांची भेट घेत आपल्याकडे बहुमत असल्याचं सांगितलं.
मध्यप्रदेशमधील सत्तासंघर्ष आता कोणत्या वळणावर पोहोचतो हे आज पाहावं लागेल. कमलनाथ बहुमत सिद्ध करुन सरकार टिकवतात की राज्यात कमळ फुलतं हे लवकरच स्पष्ट होईल.
मध्य प्रदेशात राजकीय संकट दिसून येत आहे. बहुमताची चाचणी तात्काळ घेण्यात या....
अधिक वाचा