ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेसने केली शिवसेनेची कोंडी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 08:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेसने केली शिवसेनेची कोंडी

शहर : मुंबई

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती पण राज्यपालांनी ती वेळ नाकारली, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.आम्हाला आणखी दोन दिवसांचा वेळ हवा आहे, असंही ते म्हणाले.

पाठिंबा नाही

राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापनेचा दावा करण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे. काँग्रेसच्या तळ्यात - मळ्यात भूमिकेमुळे शिवसेना सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मिळवू शकली नाही. असं असलं तरी महाराष्ट्राला स्थिर आणि प्रामाणिक सरकार द्यायचं आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. आता महाराष्ट्रात सरकार स्थापनेची काय प्रक्रिया असेल ते पाहावं लागेल, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सतत संपर्कात आहोत,असंही ते म्हणाले.या सगळ्या घडामोडींनंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येते की राज्यपाल आणखी वेगळी भूमिका घेतात ते पाहावं लागेल. महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट येऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

पत्र पोहोचलं नाही

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबदद्लचं काँग्रेसचं पत्र पोहोचू शकलं नाही, असं काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे म्हणाले. सत्तास्थापनेची चर्चा सुरूच राहील, असं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सांगितलं.

राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला पण शिवसेनेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोघांचाही पाठिंबा नसल्याने सेनेचा दावा यशस्वी ठरला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता एकत्रित निर्णय घेतील, असं सांगितलं जातंय.

मागे

महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?
महाशिवआघाडीचा फॉर्म्युला काय असणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला अखेर काँग्रेसने बाहेरून पाठ....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यपालांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यपालांच्या भेटीला

शिवसेनेला संख्याबळ सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यार....

Read more