By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2020 12:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील सरकारी नोकरी केवळ स्थानिक लोकांनाच देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय भाजपने ऐतिहासिक म्हणून घोषित केला असतानाच कॉंग्रेसने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री चौहान यांनी जाहीर केलं की, 'मध्य प्रदेशातील सरकारी नोकऱ्या आता केवळ राज्यातील लोकांनाच देण्यात येतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आम्ही आवश्यक कायदेशीर तरतुदी करत आहोत.'
मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील तरुणांना सरकारी नोकर्या देण्याच्या निर्णयाचं भाजपने स्वागत करत, हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. 'मध्य प्रदेशातील मुलं, तरुणांना सरकारी नोकर्या उपलब्ध होतील, यासाठी मी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. या ऐतिहासिक निर्णयाने राज्यातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे', असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांनी सांगितलं.
या निर्णयावर कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी, 'आपल्या 15 वर्षांच्या सरकारमध्ये बेरोजगारीची स्थिती काय होती, हे लपलेलं नाही. हातात पदवी घेऊन तरुण भटकत राहिले. हजारो पदवीधर क्लर्क, शिपायाच्या नोकरीसाठीही लाईनमध्ये उभे राहतात. मजुरांची, गरिबांची आकडेवारी ही वस्तुस्थिती सांगत असल्याचं', ते म्हणाले.
मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावर यांनी 16 ऑगस्टला आत्महत्या केली. याप्र....
अधिक वाचा