ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार?

शहर : मुंबई

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना  युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे  सरकार येईल, असे म्हटले जात होते. मात्र, या नव्या सरकारचे नामकरण करण्यात आले आहे. महाविकासआघाडी असे नाव नव्या सरकारचे असणार आहे. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करणार आहे. तसा अजेडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी असल्याने सरकार चालवताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा नवा घाट घालण्यात आला आहे.

गेल्या जवळपास महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तेचा पेच अखेर सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकार स्थापनेसाठी सुरू असलेली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्याही क्षणी नव्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण डिसेंबरपूर्वी राज्यात नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाणार आहे. तसे संकेत शिवसेना आणि आघाडीकडून देण्यात आले आहेत. आता नवे सरकार हे महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आहे.

दिल्लीत काय ठरल?

दिल्लीत झालेल्या काँग्रेस आघाडीच्या बैठकीत सरकार स्थापन करण्याबाबत जोरदार खलबते झालीत. त्यानुसार अजेंडा ठरविण्यात आला आहे. हा अजेंडा शिवसेनेला कळविण्यात आल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली. त्यामुळे या अजेंडावर पुढील सरकार स्थापन होणार आहे, याचे संकेत मिळाले आहेत. दिल्लीत ठरले की महाशिवआघाडी हे नाव ठेवता महाविकासआघाडी ठेवावे. त्यामुळे या नावाने नवे सरकार स्थापन होणार आहे.

दरम्यान, काँग्रेस आपल्या विचारसरणीत तडजोड करणार नाही. एस सामायिक कार्यक्रम ठरवला जाईल. त्यानुसार काम केले जाईल. शिवसेना किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी यापैकी कोणीही वादग्रस्त विषय उपस्थित करणार नाही. यावर सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

 

  • शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह छोट्या पक्षांच्या आघाडीला महाशिव आघाडी असे नाव दिले जाणार नाही, महाराष्ट्र सरकार विकासआघाडी असे या सरकारचे नाव असेल.

 

  • शिवसेनेचे मुख्यमंत्री पाच वर्षे असेल. तेथे दोन उपमुख्यमंत्री असतील, एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादीचा.

 

  • उपमुख्यमंत्र्यांचा काँग्रेसचा निर्णय सोनिया गांधींवर सोडण्यात आला आहे. (काँग्रेस सीडब्ल्यूसीच्या बैठकीत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री पद निश्चित केले जाईल )

 

  • सीडब्ल्यूसीची बैठकीनंतर काँग्रेसच्या कोर गटाची बैठक होऊन दुपारी तीन वाजता शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे.

 

  • उद्याची बैठक मुंबईतील वाय. बी. चव्हाण केंद्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होईल. यात एक सामायिक कार्यक्रमावर चर्चा होईल. तो शिवसेनेला दिला जाईल.

 

  • सर्व काही सुरळीत झाल्यास तिन्ही पक्षांचे नेते शनिवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील.

मागे

मुख्यमंत्री वैद्यकीय निधीबाबत महत्वाचा निर्णय
मुख्यमंत्री वैद्यकीय निधीबाबत महत्वाचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून प्रतिश्रेत असणार्‍या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय....

अधिक वाचा

पुढे  

ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर
ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर

महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम या....

Read more