ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकऱ्यांना तात्काळ २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्या –फडणवीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकऱ्यांना तात्काळ २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्या –फडणवीस

शहर : मुंबई

अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झालं आहे. सत्ताधारी पक्षानं २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाआघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. याआधी भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते.

याआधी कागदपत्रे, निकषाच्या लालफिती तात्काळ बाजूला करुन शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधी केली होती. शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे बँकांनी कर्जवसुलीच्या नोटीसा तात्काळ थांबव नाहीतर शिवसेनेशी गाठ आहे. असा इशारा ही त्यांनी दिला होता. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली होती. त्य़ावेळी त्यांनी 25 हजार हेक्टरी मदतची घोषणा केली होती. फडणवीस सरकारने त्यावेळी केलेली १० हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना देखील देवेंद्र फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आता चित्र बदललं आहे. आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या मुद्द्यावर उद्धव ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. याची सुरुवात पहिल्याच दिवसापासून सुरु झाल्याचं दिसतं आहे.

 

मागे

विरोधी पक्षनेतेपदी आजच होणार देवेंद्र फडणवीसांची निवड
विरोधी पक्षनेतेपदी आजच होणार देवेंद्र फडणवीसांची निवड

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर रविवार....

अधिक वाचा

पुढे  

सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला : राष्ट्रवादीकडे राहणार खरी पॉवर
सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला : राष्ट्रवादीकडे राहणार खरी पॉवर

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल विधानसभेत बहुमतही....

Read more