ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा माजी सैनिकांना प्राधान्याने लाभ - पालकमंत्री सुभाष देसाई

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा माजी सैनिकांना प्राधान्याने लाभ - पालकमंत्री सुभाष देसाई

शहर : मुंबई

राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातीलअशी ग्वाही मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली. जिल्हा सैनिक कार्यालय येथे आज माजी सैनिकांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या माजी सैनिकांचा श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळेमाजी सैनिक कुटुंबियांसह उपस्थित होते.

शासनाच्या उद्योग विभागाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामधून नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक लाभार्थींना 10 लाखापासून 50 लाखापर्यंत भांडवल देण्याची सोय केली आहे. या योजनेचा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने लाभ दिला जाईलअसे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात यावा व त्यातील समस्या शासनाने सोडवाव्यात असे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची यावेळी माहिती देण्यात आली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांनी आभार मानले.

 

मागे

मोहन भागवत यांच्या ताफ्त्यातील कारच्या धडकेने मुलाचा मृत्यू
मोहन भागवत यांच्या ताफ्त्यातील कारच्या धडकेने मुलाचा मृत्यू

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्त्यातील कारने एका दुचाकीला धडक दिल्याने ....

अधिक वाचा

पुढे  

रस्ते विकास महामंडळाला विविध वित्तीय संस्थांकडून २८ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध -देवेंद्र फडणवीस
रस्ते विकास महामंडळाला विविध वित्तीय संस्थांकडून २८ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध -देवेंद्र फडणवीस

 मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ....

Read more