By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, असे भाजपला का वाटले नाही? असा प्रश्न शिवसेना प्रवक्ते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या रुपात उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला, असा घणाघातही त्यांनी केली.
गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटली नाही, असे पाटील यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना विचारले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरल्याच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी भाजपला सवाल केला.
दिल्लीत 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. मात्र ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने गेल्या वर्षी केला होता. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती.
“नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”
“एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे. मात्र एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते, बंद पडते. खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असे व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा” असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.
आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, कोणीही आमच्या दैवताबद्दल काहीही बोललं तर ....
अधिक वाचा