ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई वरील 26/11च्या हल्ल्यातील सुत्रधार हफिज साईद ला पाक मध्ये अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 02:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई वरील 26/11च्या हल्ल्यातील सुत्रधार हफिज साईद ला पाक मध्ये अटक

शहर : विदेश

मुंबईत 26/11 ला झालेल्या दहशतवादी  हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि जमद-उल-दावा या दहशत वादी संघटनेचा म्होरक्या हफिज सईदला पाकिस्तान मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. हफिज च्या अटके मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाविरुद्ध दबाव आणण्याच्या भारताच्या रणनीतीला मोठे यश लाभले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळी वर भारताने वारंवार दहशतवादाविरुद्ध आवाज उठविला . त्याच बरोबर 26/11 ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा सुत्रधार हफिज सईद असल्याचे दिसून येताच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असा दाबवही भारताकडून सातत्याने टाकला जात होता. त्याचाच परिणाम म्हणजे सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. तर आता टेरर फंडिंगच्या आरोपांतर्गत तिच्यावर पाक मध्ये कारवाई करण्यात आली आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे सध्या आर्थिक स्थिती डबघाईस  आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. तेथे दहशत वादावरून कोंडी होऊ नये.पाकिस्तानी दहशतवादविरोधी कारवाया करीत आहे, हे दाखवून देण्यासाठी सईद वर कारवाई करण्यात आली असावी, असेही राजकीय निरीक्षंकांचे मत आहे. आता पाकिस्तान सईदला भारताच्या ताब्यात देणार काय? हा खरा प्रश्न आहे.

मागे

VIDEO : सुंदर आणि संपन्न महाराष्ट्र हीच आपली दिशा असायला हवी
VIDEO : सुंदर आणि संपन्न महाराष्ट्र हीच आपली दिशा असायला हवी

पाश्च्यात्य प्रगत राष्ट्रांमध्ये तिथल्या व्यवस्थेविषयी  सार्वजनिक माल....

अधिक वाचा

पुढे  

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कर्नाटक सरकार अडचणीत
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कर्नाटक सरकार अडचणीत

बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षाणीच निर्णय द्यावा. त्या....

Read more