ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 07:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हाथरस अत्याचार : उमा भारती यांचा योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर

शहर : देश

हाथरस प्रकरणावरून भाजप (BJP) नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांना घरचा आहेर दिला आहे. हाथरस प्रकरणामुळे योगी सरकारला कलंक लागल्याची टीका त्यांनी केली आहे. पोलिसांच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे भाजप, राज्य सरकार आणि स्वतः योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे त्या म्हणाल्या.

भरचौकात गोळी घालण्याची भाजप खासदाराची मागणी

दरम्यान, मीडिया आणि राजकारण्यांना पीडितांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगनी द्या, असेही त्या म्हणाल्या. उमा भारती सध्या कोरोनामुळे ऋषिकेश इथे एम्प रूग्णालयात उपचार घेत आहेत. आपण बऱ्या असतो तर नक्की पीडित कुटुंबाला भेटायला गेलो असतो. बरे झाल्यावर आपण भेटायला जाणार आहोत, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री ठोस पावले उचलतील असे वाटलं होते, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री योगी यांना आवाहन

भारती म्हणाल्या की संपूर्ण हाथरस घटकाचे बारकाईने निरीक्षण केले जावे. त्याचबरोबर, त्यांनी योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, माध्यमातील व्यक्ती आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांना या पीडित कुटुंबाची भेट घेता यावी. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भारती म्हणाल्या, 'मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ असली तरी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे.' परंतु, पोलिसांनी गाव आणि पीडित परिवाराला घेरले गेल्याने तिला बोलण्यास भाग पाडले आहे, असेही त्या म्हणाल्या. 

त्यांनी ट्वीट केले की, 'हाथरसच्या घटनेबद्दल मी पाहिले. प्रथम मी विचार केला की मी बोलू नये, कारण आपण या बाबतीत योग्य कारवाई करत आहात. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने गाव आणि पीडितेच्या कुटूंबाला घेरले आहे, तेथे कितीही युक्तिवाद असले तरी ते विविध भीती आणि शंका निर्माण करतात. १४ सप्टेंबर २०२० रो जी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिला दिल्लीत उपचारासाठी हलविण्यात आले. मंगळवारी पीडितेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.

           

मागे

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी
पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी

एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने हाथरसचे एसपी, डीएसपी आणि इतर अ....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अमरावतीत फसवणुकीची तक्रार दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अमरावतीत फसवणुकीची तक्रार दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चांदूर रेल्वेत फसवणुकीच....

Read more