By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 6800 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी 2 हजार 88 कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य आणि मनुष्यबळ 75 कोटी, पडलेली घरे पुर्णपणे बांधून देणार, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 576 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले. पुरग्रस्त भागाच्या मदतीसाठी 6 हजार 813 कोटी रूपये मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची मागणी केली आहे.
या मदतीमध्ये तात्पुरत्या छावण्यांसाठी 27 कोटी, जनावरांसाठी 30 कोटी रुपये व स्वच्छतेसाठी 79 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे पुरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे म्हटले जाते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग पुढच्या महिन्यात घोष....
अधिक वाचा