ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

शहर : मुंबई

बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. मात्र, आपण राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. संघटनात्मक पातळीवरील राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या राजकारणाने पातळी सोडली. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत खेद व्यक्त केला.

तसेच मतदारांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल भावनिक किंवा मतदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी मी मतदानाच्या अगोदर हा निर्णय घेऊ शकलो असतो. पण मला लोकांना भावनिक करायचे नव्हते, तर मेरिटवर निवडणुकीत विजय मिळवायचा होता. म्हणून मी दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली बविआने जवळपास २८ वर्षे वसई पट्ट्यातील राजकारणावर वर्चस्व राखले आहे. हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध, पक्ष कार्यकर्त्यांवर त्यांच्या विचारांचा असलेला पगडा आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी स्थानिक राजकारणात कायमच स्वत:चे महत्त्व अबाधित ठेवले होते.

मात्र, यंदा शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांच्यामुळे बविआसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात प्रदीप शर्मा विरुद्ध क्षितीज ठाकूर ही लढत अनेक कारणांनी गाजत आहे. प्रदीप शर्मा यांनी प्रचारादरम्यान आपण वसई-विरारमधील गुंडगिरी मोडून काढू, असे सांगत ठाकूर कुटुंबियांच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राजकारण रंगतदार झाले आहे.

पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू या विधानसभेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. पालघर शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर विक्रमगड आणि डहाणू भाजपकडे आहे. त्यामुळे महायुतीच्या रेट्यापुढे बविआ आपले गड राखण्यात यशस्वी होणार का, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मागे

227 मतदार असेलेल्या गावात शून्य मतदानाची नोंद
227 मतदार असेलेल्या गावात शून्य मतदानाची नोंद

केंद्र शासन, राज्य शासन, निवडणूक आयोगासह अनेक प्रतिष्ठितांनी आव्हान करून क....

अधिक वाचा

पुढे  

निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारावरावर गुन्हा दाखल
निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारावरावर गुन्हा दाखल

विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच काही नेत्यांनी जल्लोष केला. यासंदर्....

Read more