By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 03:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सोमवारी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा दिसून आल्या. यावेळी राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळच्या सुमारास उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबईतील गांधीनगर येथील मतदान केंद्रावर पोहोचले. येथे रांगेत उभे राहून ठाकरे कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वांनी मतदान करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले. मतदान केंद्रावर ठाकरे कुटुंबीयांसोबत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारी पूनम महाजनही उपस्थित होत्या.
लोकसभा निवडणूका सुरू असताना विक्रमगडमध्ये वाटप करण्यात आलेल्या व्होटर ....
अधिक वाचा