ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2020 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'

शहर : मुंबई

भारताकडे जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता आहे, असा दावा मोदी सरकारमधील नेत्यांकडून केला जातो. मात्र, आता जगाचं राहू द्या, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याची गरज आहे, अशी खोचक टिप्पणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी डिजिटल हेल्थ कार्ड योजनेची घोषणा केली. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावे. पण आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तात्काळ सुटेल, असा वाटत नाही.

आतापर्यंत देशात १४ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे, पण घराबाहेर पडून काय करायचे? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर बरे झाले असते, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.

तसेच कोरोनावर जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत लोकांमधील भय संपणार नाही. परिस्थिती सुधारली नाही तर भूक आणि बेरोजगारीमुळे नवे संकट निर्माण होईल. तेव्हा स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्याला पाचारण करावे लागेल. स्वातंत्र्यदिन  येतो  जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दु: तेच आहे, त्यांचा मुकाबला कसा करणार, असा सवाल शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे.

 

मागे

सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण
सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असल....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांची प्रकृत्ती उत्तम, पण राज्यभरात न फिरण्याची विनंती करणार- टोपे
शरद पवारांची प्रकृत्ती उत्तम, पण राज्यभरात न फिरण्याची विनंती करणार- टोपे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काही दिवसांपूर्वीच मुंब....

Read more