By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 06, 2021 08:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात ऐकीकडे कोरोना रूग्णांची संख्या मंदावत आहे, तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. शिवाय त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. पण गेल्या वर्षी उदयास आलेल्या या विषाणूवर लस तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
दरम्यान, अनिल देशमुख ट्विट करत म्हणाले, 'आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.' असं देखील ते म्हणाले.
शिवाय, मी लवकरच कोरोना विषाणूवर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल. असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यामुळे राज्य़ाचे गृहमंत्री लवकरच सेवेत हजर राहतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूरला जाऊन आंदोलन श....
अधिक वाचा