By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील किल्यांच जतन होण महत्वाच असताना महाराष्ट्र सरकारने अशा किल्यांवर हॉटेल सुरू करणासाठी परवानगी दिली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात 350 पेक्षा अधिक गडकिल्ले आहेत. त्यातील 25 किल्यांवर हेरिटेज हॉटेल सुरू करण्यासंबंधात एमटीडिसी कडून यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले महाराष्ट्राची शान असताना त्यांना जागतिक ठेव्याप्रमाणे संरक्षणकडून हा वारसा जतन केला पाहिजे मात्र अस होताना दिसत नाही.
ह्या विरुद्ध दुर्ग प्रेमी आणि शिवभक्तामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही यावर सरकारची हजेरी घेतली आहे. "औरंगजेबाला त्याच्या संपूर्ण हयातीत जे जमले नाही ते सरकारने 5 वर्षात करून दाखवलं" अस म्हटले आहे. तर धनंजय मुंडे यांनी "शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे" असे म्हणत "याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर..." असा गर्भित इशाराही दिला आहे.
तर सुप्रिया सुळे यांनी " महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो." असे म्हणून विरोध दर्शीविला आहे व पुढे बोलताना "राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे." अशीही मागणी व्यक्त केली.
तर जनतेतून संताप व्यक्त केल्यानंतर पर्यटन विभागाने "शिवछत्रपतीच्या व मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातील किल्यांचे पावित्र कायम राखले जाईल" असे म्हटले आहे.
आयएनएक्स मीडिया केस च्या सुनावणीमध्ये कोर्टाने पी. चिदम्बरम यांचा जामीन अर....
अधिक वाचा