By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मतदानापूर्वी ४८ तास समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या पेड राजकीय जाहिराती आणि मजकूर माध्यमांवरून तीन तासांपेक्षा कमी वेळात हटवला जाऊ शकतो की नाही, यावर एका आठवड्यात निर्णय घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तर, आचारसंहितेच्या काळात मतदानाच्या ४८ तास आधी समाज माध्यमांद्वारे राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते जाहिरातबाजी करतात. त्यावर नियंत्रण आणण्याचा आदेश निवडणूक आयोगाला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले सागर सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलीय. तर, आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजमाध्यमे स्वत:हून संहिता घालून घेणार आहेत. त्यामुळे ज्या राजकीय जाहिरातींची किंवा मजकुराची निवडणूक आयोगाने पडताळणी केली नसेल तसेच त्यांना फ्लॅग करण्यात येईल आणि अशा जाहिराती आणि मजकूर समाजमाध्यमे तीन तासांत हटवतील, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील प्रदीप राजगोपाल यांनी मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाला दिलीय.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणी आचारसंहितेचा....
अधिक वाचा