By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 12:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक आहे, मी सामने खेळवतो, मी खेळाडू नाही, क्रिकेट खेळत नाही, क्रिकेट खेळवतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होवू शकतं, या नितिन गडकरी यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे.
राज्यात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे. राज्यापुढील यक्ष प्रश्न सुटणेचं गरजेचं आहे. सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू आहे, लवकरच मार्ग निघेल. तसेच ज्यांची मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही मागणी असेल, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असं देखील आपल्या सूचक वक्तव्यातून शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नेहमीच मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हेच सुरू असतं, आणि पुन्हा भाजपचंच सरकार येईल असं ते म्हणत असतील, तर ते ज्योतिषशास्त्र देखील पाहतात, म्हणजे भाकीत करतात हे आपल्याला माहित नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अखेर सत्तास्थाप....
अधिक वाचा