By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 05:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काँग्रेसची ईशान्य मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिच्या धर्मावरून सध्या ती खूप चर्चेत आली आहे. उर्मिलाने लग्नानंतर तिचा धर्म बदलल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती. अभिनेत्री पायल रोहतगीने तर उर्मिलाने धर्मपरिवर्तन केले आहे आणि तिचे नाव मरियम अख्तर मीर असल्याचा दावाही केला होता. या सर्व चर्चांवर आज उर्मिलाने आपले उत्तर दिले असून लग्नानंतर आपण धर्म बदलला नसल्याचे तिने सांगितले आहे.
उर्मिलाने दिलेल्या एका मुलाखतीत तिने हा दावा केला आहे की‘मी माझा धर्म बदललेला नाही. माझा नवरा मुस्लीम आहे, पण तरी देखील मी धर्म बदलेला नाही. मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचे सौंदर्य आहे. ज्यामुळे प्रत्येकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे. ट्रोलर्स इस्लामला एका विशिष्ट रंगात रंगविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी लोकं फक्त समाजात द्वेष पसरवू शकतात, असे उर्मिलाने यावेळी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकरवर अभिनेत्री पायल रोहतगी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे. उर्मिलाने लग्नानंतर धर्म परिवर्तन केले असून आता ती उर्मिला मातोंडकर नाही तर मरियम अक्तर मीर आहे, असा दावा पायलने केला होता.
'ऐकतील ते पुणेकर कसले... जगात काहीही होवो...पुणेकर त्यांच्या सवयी सोडणार नाह....
अधिक वाचा