By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2020 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवणी केली आहे. यासाठी भाजप सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तर सध्या चर्चेत आलंय.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजची बैठक झाली. जीसटी तसंच करोना संकटामुळे राज्यांना झालेलं आर्थिक नुकसान याशिवाय जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी वारंवार होत असलेल्या मागणीवर सोनिया गांधी बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मंत्रीमंडळाची बैठक होती. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना उद्धव यांना बोलू देण्यास सांगितले. उद्धव ठाकरे त्यावर ममता दीदींना म्हणाले इजाजत है क्या दीदी..
ममता : उद्धव जी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है..
उद्धव ठाकरे : लढने वाले बाप का लढने वाला बेटा हूं..
जीएसटीचे पैसे केंद्राकडून येत नाहीत. त्यामुळे आधीची व्यवस्था बरी होती की आताची हा विचार करण्याची वेळ आली आहे. काही गोष्टी चुकत असतील तर त्या सुधारायला हव्यात. परत जुनी व्यवस्था लावता येईल का याचाही विचार करायला हवा, अशा विषयांवर चर्चा करण्यात आलीय
शाळा, कॉलेज सुरु करणे धोक्याचे - मुख्यमंत्री
आम्ही विकास करण्यासाठीच सरकारमध्ये आलेलो आहोत. लॉकडाऊन लावण्यासाठी सरकारमध्ये आलो नाही. पण काही गोष्टींचा तारतम्याने विचार करणे गरजेचे आहे. मध्यंतरी मी बातमी वाचली अमेरिकेत शाळा सुरू केल्यामुळे 97 हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी उचललेल्या दोन मुद्द्यांचा उल्लेख त्यांनी या बैठकीत केला. शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असं करायला काय हरकत आहे आणि पर्यावरणाची हानी करून मेळघाट आतून रेल्वे नेण्याचा घाट कशाला?
साथ मे है और साथ मे रहेंगे : मुख्यमंत्री ठाकरे
संकट आलं की आपण एकत्रित येतो. पण आपल्याला एकत्रित यायला संकटाची गरज कशाला आहे? आपण एरवीसुद्धा भेटत राहिले पाहिजे ज्यामुळे संकटच घाबरून म्हणेल की हे लोक एकत्र आहेत. साथ मे है और साथ मे रहेंगे. एक बार तय करो डरना है, या लढना है, असेही ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला ....
अधिक वाचा