ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही : उद्धव ठाकरे

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही : उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

            मुंबई : ''मला नाईट लाईफ'' हा शब्दच मुळात आवडत नाही. पण तरीही मुंबईच्या काही भागांमध्ये प्रयोगिक तत्वावर आपण हा प्रयोग करून पाहणार आहोत,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला, शहराला विशिष्ट असा इतिहास आणि संस्कृती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 'नाईट लाईफ' सुरू करता येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

         आयपीएस अधिकार्‍यांच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते. 

         मुंबईत 'नाईट लाईफ' असावं, अशी संकल्पना यापूर्वी विद्यमान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप-शिवसेना युती सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी तशी आग्रही मागणी केली होती. मात्र त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री होताच आदित्य ठाकरे यांनी आपली 'नाईट लाईफ' ची संकल्पना अंमलात आणण्याचा दृष्टीने पावले टाकली आहेत. असे असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात 'नाईट लाईफ' सुरू करता येणार नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे दिलासाच दिल्याचे म्हणावे लागेल. 

           नाईट लाईफसाठी आवश्यक त्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची तजवीज झाल्यानंतर मुंबईतील काही भागातच हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू राहातील. ज्यांची इच्छा असेल ते २४ तास तेथे व्यवसाय करू शकतात.

मागे

आदिवासी विभागातील घोटाळ्याप्रकरणी २१ अधिकारी निलंबित
आदिवासी विभागातील घोटाळ्याप्रकरणी २१ अधिकारी निलंबित

        मुंबई - आदिवासी विभागात सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली असून आदि....

अधिक वाचा

पुढे  

शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्ती: ही तर गरिबांची थट्टाच 
शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्ती: ही तर गरिबांची थट्टाच 

       मुंबई - येत्या २६ जानेवारीपासून राज्यात १० रुपयात थाळीचा लाभ ही य....

Read more