ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मी नागपूरला कोणाचीही भेट घेतलेली नाही - एकनाथ खडसे

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मी नागपूरला कोणाचीही भेट घेतलेली नाही - एकनाथ खडसे

शहर : नागपूर

          नागपुर - सकाळपासून माध्यमांवर एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याच्या बातम्या सुरू होत्या, मात्र आज आपण कोणाचीही भेट घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय, वरिष्ठांनी माझं मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

           मी नागपूरला कोणाचीही भेट घेतलेली नाही, या सर्व अफवा आहेत. विधानभवानात माझी काही कामं असतात, मी मुख्यमंत्र्यांना भेटेन, शरद पवार आले तर त्यांना भेटेन आणि कोणी भेटायला आले तर त्यांना देखील भेटेन. मात्र याचा तुम्ही वेगळा अर्थ काढत आहात, कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही असे ते म्हणाले.


          विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून भाजपावर काहीसे नाराज दिसत असलेले एकनाथ खडसे यांनी, गोपीनाथ गडावरील भाषणावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या पक्षातच राहतील, पण माझा काही भरवसा नाही, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. 
 

मागे

 एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

          नागपुर - भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे हे मोठा राजकीय नि....

अधिक वाचा

पुढे  

'उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ?'
'उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ?'

उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्....

Read more