ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मी एकही शब्द चुकीचा बोललो नाही, चूक असेल तर फाशी घेईन जनतेने न्याय करावा - धनंजय मुंडे

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 02:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मी एकही शब्द चुकीचा बोललो नाही, चूक असेल तर फाशी घेईन जनतेने न्याय करावा - धनंजय मुंडे

शहर : सातारा

कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या खोट्या क्लिपबाबत आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कालपासून पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला. १७ तारखेला मी विड्यात केलेल्या भाषणाची एक क्लिप सध्या चुकीच्या पद्धतीने एडिट केली आहे. आम्हा बहिण-भावाच्या नात्यात काही जण विष कालवण्याचे काम करत असल्याचा खुलासा त्यांनी केला.

काल सुरू असलेल्या गोंधळामुळे मी जगावं की नाही अशा प्रश्न रात्रीपासून पडत आहे. आजपर्यंत मी १५०० बहिणींचं कन्यादान केले. राजकीय विरोध असला तरी माझ्या त्या रक्ताच्या बहिणी आहे. त्यांच्याबाबत मी असं कसं बोलू शकतो? ज्याने कोणी हे कृत्य केलंय त्यांच्याही बहिणी असतील, कुटुंब असेल त्याने त्यांचा तरी एकदा विचार करायला हवा होता. असं वक्तव्य मुंडे यांनी भावनावश स्वरात केले.

आम्ही एकाच घरात वाढलो होतो, घरच्या मोठ्या लोकांच्या हाताखांद्यावर खेळलोय. त्या घराच्या महिलांनी मला घास भरवला आहे. मी त्यांच्याच विषयी असं बोलूच शकणार नाही असे ठामपणे सांगत त्यांनी सर्व आणि खोट्या आरोपांना उधळून लावले.

 काही जण मला संपवण्याचा, खलनायक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून बदनामी करण्याचा कट रचला जात आहे. मला राजकारण करण्याचा अधिकार नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

धनंजय मुंडे झाले भावूक

इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करण्याची गरज काय? निवडणूक लढवू नको असं स्पष्ट सांगितले असते तरी मी माघार घेतली असती असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी सर्वांचं विचार करायला भाग पाडले. भाजपमध्ये आलेले 'नवे भाऊ' आमच्या बहिण भावाच्या नात्यात फूट पाडत आहे. याआधीही अशाच घटनांमुळे आमच्या कुटुंबात फूट पडली होती. ज्याच्या वेदना मी आजही भोगतोय हे दुःख बोलून दाखवले.

आधी दोन भावांत, नंतर काका-पुतण्यामध्ये फूट पाडली. आता काही जण बहिण भावात फूट पाडत आहेत. गेली ७ वर्षे मला खलनायक म्हणून संबोधले. मी लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालो. कालचा धन्या आज धनूभाऊ झाला. हेच काहींच्या डोळ्यात खुपतंय हा आरोप करत त्यांनी अफवा पसरवणा-यांना चपराक दिली. मातीची शपथ घेत त्यांनी बहिणीला काहीच वाईट बोललो नसल्याची आणि त्याची सत्यता ओरिजनल व्हिडीओ द्वारे तपासण्याची विनंती केली. मायबाप जनताच माझा न्यायनिवाडा करेल असे म्हणत त्यांनी लोकांना सत्याच्या बाजूने विचार करायला सांगितले.

माझ्यावर लगेच केस कशी

कालच्या प्रकारा नंतर माझ्या विरुद्ध लगेच केस दाखल केली जाते आणि आमच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीची दखल ही का घेतली जात म्हणत त्यांनी सत्तेच्या दुरुपयोगाकडे लक्ष वेधले.

मागे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 मुंबईकरांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं....

अधिक वाचा

पुढे  

मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बंद पडली
मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बंद पडली

182-वरळी विधान सभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बं�....

Read more