ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर मला वेगळा विचार करावा लागेल : एकनाथ खडसे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 07:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर मला वेगळा विचार करावा लागेल : एकनाथ खडसे

शहर : जळगाव

माझा पक्ष सोडण्याचा विचार नसला तरी जाणीवपूर्वक काही लोकांकडून माझा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे. काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक अपमान करत  आहेत. त्यामुळे त्याची नोंद मला घ्यावी लागेल. शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत. जर असाच माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल,” असे वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले.

मी पक्ष सोडणार नाही. पण एवढं निश्चित आहे जळगाव जिल्ह्याची मिटींग होती. उत्तर महाराष्ट्राची मिटींग होती. तर मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीसाठी बोलवलं.मला निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलं आहे. मला आता कोअर ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं आहे. अशा प्रत्येक ठिकाणी अन्यायाने वागणूक होत असेल जाणीवपूर्वक मला दूर ठेवत असतील तर मी काय करावे. असा प्रश्नही खडसेंनी महाराष्ट्रातील जनतेला  विचारला.

शेवटी मी माणूस आहे मी देव नाही मला भावना आहे. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा असेल तो पक्षाशी बोलून घेईल. जी जबाबदारी पक्ष देईल ती घेईन. वारंवार अत्याचार अन्याय झाला तर मला वेगळा विचार करावा लागेल. असेही खडसेंनी ठामपणे सांगितले.

भाजपने पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी जळगावात गेले होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यांच्याशी मी जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील निवडणुकाबाबत चर्चा केली. त्यात रोहिणी खडसेंच्या मतदारसंघात पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आणि त्यांचा पराभव फक्त 1800 मतांनी झाला. त्याबाबत माझ्याकडे जे पुरावे होते. त्यात फेसबुक पोस्ट, ऑडियो क्लिप, एकमेकांचे झालेले संभाषण जे पक्षविरोधी होतं. याबद्दलचे आणखी काही पुरावे हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले. त्यावेळी मी त्यांना हे पुरावे माध्यमांना दाखवण्याची परवानगी द्यावी. असे त्यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले.

हा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. जर तुम्ही असे केलात, तर पक्ष शिस्तीचा भंग होऊ शकतो. असे मला चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याबाबत आपण अमित शाह, जे.पी नड्डा यांच्याशी चर्चा करु आणि तुम्हाला योग्य न्याय मिळवून देऊ. तसेच ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा अन्य कारवाई करु असेही खडसे  म्हणाले.

मुळात मी ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला असे कधीही बोललो नाही. मी बहुजन समाज आणि ओबीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अन्याय होतो आहे अशी त्यांच्यात भावना आहे. कार्यकर्ते आजही माझ्याशी बोलताना असे बोलतात. त्यांना आमच्याविरोधात अन्याय होतो असे वाटते. त्यात आज या ठिकाणी ओबीसीवर अन्याय होत नाही असे नाही. असेही खडसे म्हणाले.

मागे

सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना विदर....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॉस्पिटलमध्ये घेतली अरुण शौरींची भेट...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॉस्पिटलमध्ये घेतली अरुण शौरींची भेट...

पुणे - दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात महासंचालकांच्या परिषदेसाठी ....

Read more