ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मी चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक : उद्धव ठाकरे

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मी चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक   : उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून देशभरात 'मै भी चौकीदार' मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत भाजप नेत्यांनी मोठा सहभाग नोंदवला असून सोशल मीडियावरील आपल्या नावाआधी अनेकांनी चौकीदार असं लिहिलेले आहे. परंतु, एनडीएमधील मित्र पक्षांनी या मोहिमेपासून अंतर ठेवले आहे.

आपण चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्धव यांनी आपण काँग्रेसमुक्त भारताच्या बाजूने नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सभेत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत असतात. परंतु, उद्धव यांनी यापासून फारकत घेतली आहे. मला चौकीदार होण्याची गरज नसून मी जन्मत:च शिवसैनिक आहे. त्यामुळे मी कायम शिवसैनिकच राहिल. काँग्रेसमुक्त अभियानासाठी आपण काम करत नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे देण्याचे आपण ठरवल्याचे उद्धव म्हणाले. दरम्यान आयोध्येतील राममंदिर बांधण्यासाठीच्या हालचालींना वेग न आल्यास आपण पुन्हा एकदा आयोध्येचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे नुकतेच अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातला गेले होते. त्यानंतर उद्धव यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव यांच्यावर कडाडून टीका केली आहे. भाजपवर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख गुजरातला काय मुका घेण्यासाठी गेले होते, का असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.        

मागे

एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा? मनसेच आशिष शेलारांना चोख प्रत्युत्तर
एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा? मनसेच आशिष शेलारांना चोख प्रत्युत्तर

मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राजकीय पक्षांची प्रचाराची रंगत वाढत चालल....

अधिक वाचा

पुढे  

loksabha election 2019: फेसबुकने काँग्रेसची 687 पेज हटवली
loksabha election 2019: फेसबुकने काँग्रेसची 687 पेज हटवली

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणातील मतदानाला काही दिवस राहीले आहेत. या पार....

Read more