ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कलम ३७० रद्द झाले तर संपूर्ण देश पेटेल- मेहबुबा मुफ्ती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 06:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कलम ३७० रद्द झाले तर संपूर्ण देश पेटेल- मेहबुबा मुफ्ती

शहर : jammu

केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यास संपूर्ण देश पेटेल, असे वक्तव्य राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. त्यांनी सोमवारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यातील कलम ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली. मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर अगोदरच दारुगोळ्याच्या कोठारावर बसला आहे. जर कलम ३७० रद्द झाले तर फक्त काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देश पेटेल. त्यामुळे भाजपने विस्तवाशी खेळ करू नये, असे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.

भाजप  'कलम ३७०' आणि '३५ रद्द करण्यासाठी आग्रही आहे. भाजपकडून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात तसे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनीही केंद्र सरकाराला इशारा दिला होता. काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना आणून वसवण्याचा विचार काहीजण करत आहेत. जेणेकरून आमची लोकसंख्या कमी होईल, असे त्यांना वाटते. हे सर्व सुरु होताना आम्ही काय झोपून राहणार का? आम्ही याचा मुकाबला नक्की करू. ३७० कलम रद्द केले तर अल्लाह कुठे राहणार? कदाचित अल्लाहचीच इच्छा असेल की आम्ही त्यांच्यापासून स्वतंत्र व्हावे. आम्ही पण बघतोच तुम्ही काश्मीरमधील कलम ३७० कसे रद्द करता? मग तुमचा झेंडा फडकावयला कोण तयार होते, हे मी बघतोच. अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्याने तुम्ही आमचे हदय तोडाल, असे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मागे

आजम्मू-काश्मीरचे कलम 35 A आणि 370 बद्दल भाजपाचे मोठे श्वासन
आजम्मू-काश्मीरचे कलम 35 A आणि 370 बद्दल भाजपाचे मोठे श्वासन

लोकसभा निवडणूक 2019 साठी भारतीय जनता पार्टीने आपले संकल्प पत्र जारी केले आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार रिंगणात
पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार रिंगणात

राज्यात पहिल्या टप्प्यातील सात लकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आ....

Read more