ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 01, 2019 01:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला इशारा

शहर : मुंबई

वेळ पडल्यास आम्ही आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करू सरकार स्थापन करू, असा इशारा देणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपने रामबाण अस्त्र उपसले आहे. शिवसेना आणि भाजपमधील सत्तावाटपाच्या रस्सीखेचीमुळे निकालाला सात दिवस उलटूनही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मात्र, येत्या ८ तारखेपर्यंत राज्यात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. ते शुक्रवारी 'झी २४ तास'शी बोलत होते.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, शिवसेना भाजपमधील पेच सुटला पाहिजे. 'मी बांधेन ते तोरण, मीच करेन ते धोरण', असा पवित्रा घेऊन चालणार नाही. शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे. जनतेच्या हितासाठी दोन्ही पक्षांना चर्चेतून मार्ग काढावा लागेल. अन्यथा राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. ८ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेना माघार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकारपरिषदेत भाजपला एकट्याने सत्तास्थापन करण्याचे धाडस करू नका, अन्यथा फजिती होईल, असा इशाराही दिला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात झालेली चर्चा संपूर्ण देशाने पाहिली होती. विधानसभा निवडणुकीत जनतेनेही शिवसेना आणि भाजप यांना एकत्रितपणे कौल दिला आहे. जनतेचा हा कौल मानण्यास भाजप नकार देत असेल तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही. तशी वेळ आल्यास शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते, असा दावा यावेळी राऊत यांनी केला.

मागे

शिवसेना सोबत आली तर नाहीतर शिवसेनेशिवाय …,भाजपाच्या मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला
शिवसेना सोबत आली तर नाहीतर शिवसेनेशिवाय …,भाजपाच्या मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला

विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेचं गणित कोण जुळवून आणणार या प्रश्नाव....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेना-भाजपामध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना शरद पवार शेतकऱ्यांच्या भेटीला
शिवसेना-भाजपामध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना शरद पवार शेतकऱ्यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाम....

Read more