ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 03:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा

शहर : delhi

भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा एकदा सिंधू पाणी वाटप कराराचा मुद्दा उपस्थित केला आहे. नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला पाणी कोंडीचा इशारा दिला आहे. भारत सिंधू पाणी वाटप कराराचा अभ्यास करत आहे. पाकिस्तानच्या दिशेने वाहणारे पाणी भविष्यात राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या दिशेने वळवण्यात येईल असे गडकरी यांनी सांगितले. पाकिस्तानला तीन नद्यांमधून पाणी जाते. शांतता आणि मैत्री संबंधांच्या आधारावर भारत-पाकिस्तामध्ये पाणी वाटप करार झाला होता. पण आता ही गोष्ट उरलेली नाही. त्यामुळे हा करार पाळणे आमच्यासाठी बंधनकारक नाही असे गडकरी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाचे समर्थन सुरु आहे. पाकिस्तानने दहशतवाद्ला खतपणी घालणे थांबवले नाही तर पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे भारताने या पाणी वाटप कराराचा अभ्यास सुरु केला आहे. पाकिस्तानऐवजी हरयाणा, राजस्थान आणि पंजाबला हे पाणी मिळेल असे गडकरी म्हणाले. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा इशारा दिला होता.

मागे

सिंहांकडून 640 जणांना चहा, तर साध्वींकडून 581 जणांना टोप्या!
सिंहांकडून 640 जणांना चहा, तर साध्वींकडून 581 जणांना टोप्या!

लोकसभा निवडणूक कालावधीत आयोगाला तीन वेळा प्रचारासाठी खर्च केलेल्या खर्चा....

अधिक वाचा

पुढे  

गौतमवर ‘गंभीर’ आरोप करताना ’आप’च्या उमेदवार रडू लागल्या!
गौतमवर ‘गंभीर’ आरोप करताना ’आप’च्या उमेदवार रडू लागल्या!

सहाव्या टप्प्यातील प्रचार आज संपला.  लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्य....

Read more