ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेस हरली तर जबाबदारी माझी असेल,मी राजीनामा देईन- कॅप्टन अमरिंदर सिंह

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेस हरली तर जबाबदारी माझी असेल,मी राजीनामा देईन- कॅप्टन अमरिंदर सिंह

शहर : ahmedgarh

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले नाही तर त्याची सर्व जबाबदारी माझी असेल आणि मी पदाचा राजीनामा देईन असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केले. न्यूज एजंसी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. लोकसभा निवडणूकीच्या राज्यातील निकालात काँग्रेसचा सुपडा साफ झाला तर मी याची पूर्ण जबाबदारी घेत राजीनामा देईन असे ते म्हणाले. राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार निवडणुकीच्या निकालासाठी जबाबदार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस उमेदवाराच्या विजय किंवा पराभवाला काँग्रेसचे मंत्री आणि आमदार जबाबदार असतील असे हायकमांडने ठरवले आहे. मी देखील ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण मला पंजाबमध्ये काँग्रेसला सर्व जागा मिळतील हा मला विश्वास आहे असेही अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये 19 मेला मतदान होणार आहे.

शिरोमणि अकाल दल(बादल) आणि भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने एक दशक पंजाबचे नेतृत्व केले. त्यानंतर 2017 साली काँग्रेसला राज्यात विजय मिळाला. यानंतर अमरिंदर सिंह पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनले.

मागे

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी  थंडावणार
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी ....

अधिक वाचा

पुढे  

वाचाळ नेत्यांनी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या, बजावली कारणे दाखवा नोटीस
वाचाळ नेत्यांनी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या, बजावली कारणे दाखवा नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाचा वाचाळ नेत्या....

Read more