ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिलांवरील अत्याचारावर तात्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 05:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महिलांवरील अत्याचारावर तात्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

मुंबई - राज्यात महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याबाबत सक्त आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेत. मुख्यमंत्री ठाकरे यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबतची बैठक झाली. बैठकीत तब्बल एक तास सुरु चर्चा सुरु होती. यावेळी राज्यातल्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला गेला. यावेळी निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा, असेही बजावले.


या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. जेणेकरुन महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ आणि जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल, असे काम करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

दरम्यान, निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करण्यात यावी. गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने वापरता येईल. त्याबाबत त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.
 

मागे

मुंबईसह विविध महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान...
मुंबईसह विविध महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान...

मुंबई - महाराष्ट्रातील विविध पाच महानगरपालिकेतील सात रिक्त पदांसाठीची ....

अधिक वाचा

पुढे  

'भाजपने आपल्या नाराज नेत्यांची त्वरीत काळजी घ्यावी'...
'भाजपने आपल्या नाराज नेत्यांची त्वरीत काळजी घ्यावी'...

मुंबई - एकनाथ खडसे काँग्रेस पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य का....

Read more