By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
कलम 370 हटवल्यापासून भारताविरूद्ध घसा कोरडा करणार्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना थोडी फार उपरती होत असल्याचे दिसत आहे असे वाटते. सोमवारी लाहोरमध्ये एका कार्यक्रमाला गेले असताना शीख समुदायासमोर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान 'आता युद्ध नको,' असे विधान करताना दिसत आहेत.
"युद्धाची सुरवात पाकिस्तान कधीही करणार नाही. दोन्ही देश अन्वस्त्र संपन्न असल्याने युद्ध झाल्यास संपूर्ण जगाला धोका निर्माण होईल . पाकिस्तान अण्वस्त्र पहिल्यांदा वापरणार नाही" असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. "पाकिस्तानने भारतासोबत चर्चा करण्याचं खूप प्रयत्न केले पण भारत बडेपणा करून तुम्ही अस करा तस करा, असे आदेश देतो" असही इम्रान खानने म्हटले आहे.
Pakistan PM Imran Khan says Pakistan will not use nuclear weapons first amid tensions with India: Reuters pic.twitter.com/0JfFqKUI0r
— ANI (@ANI) September 2, 2019
बालाकोटच्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील चर्चा थांबविण्यात आली होती. त्यांनंतर कलम 370 हटवल्यापासून दोन्ही देशात तणावाच वातावरण आहे. युद्धाची घोषणा करणार्या पाकिस्तान आणि इम्रान खान यांना ही उपरती कशी काय झाली की पाकिस्तान मधल्या महागाईच्या आणि आर्थिक डबघाईच्या पार्श्वभूमीवर हा यूटर्न घेतला गेलाय. अशी चर्चा नेटकर्यांमध्ये सुरू आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद याद....
अधिक वाचा