ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

म्हाडाच्या सर्व प्रकल्पामध्ये पोलिसांसाठी घरे आरक्षित ठेवणार: जितेंद्र आव्हाड

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 24, 2020 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

म्हाडाच्या सर्व प्रकल्पामध्ये पोलिसांसाठी घरे आरक्षित ठेवणार: जितेंद्र आव्हाड

शहर : मुंबई

       मुंबई : राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसाठी म्हाडाच्या सर्व प्रकल्पांमध्ये घरे आरक्षित ठेवणार असल्याचे सांगून पोलिसांना खुशखबर दिली आहे. पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी ही घोषणा केली. 

          या संदर्भात बोलताना आव्हाड पुढे म्हणाले की, राज्यात यापुढे म्हाडाची १० टक्के घरे राखीव ठेवण्यात येणार आहेत. पोलीस दलातील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसाठी ही घरे राखीव असणार आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. म्हाडामध्ये कोणतीही फाइल ४५ दिवसांच्या आत निकाली काढली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी बोलताना दिली. 

        फोन टॅपिंग प्रकरणावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'माझी जेवढी भाषणे झाली त्यात सर्वात आधी मी भीमा-कोरेगाव प्रकरणावर आणि फोन टॅपिंगचे आरोप केले आहेत. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मी कॅबिनेटमध्ये करणार आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सुरक्षा काढली तरी आम्ही घाबरत नाही. मुळात आम्ही असं सूडाचं राजकारण करीत नाही. शरद पवार यांच्यावर त्याकाळी गोपीनाथ मुंडे प्रचंड आरोप करायचे. त्यावेळी पवारांनी मुंडे यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. आजही फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री नाहीत तरी त्यांची सुरक्षा आमच्या सरकारने कायम ठेवली आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.     
 

मागे

'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद
'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद

          मुंबई : वंचित  बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर य....

अधिक वाचा

पुढे  

सीएए: हिंसक आंदोलनामागे पीएफआय?
सीएए: हिंसक आंदोलनामागे पीएफआय?

        नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झ....

Read more