By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 03:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांची मागणी राज्यभरातील राष्ट्रवादी आणि कॉग्रेस नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील स्टार प्रचाराकांमध्ये राज ठाकरे आघाडीवर असून त्यांच्या पाठोपाठ आता धनंजय मुंडे यांच्या सभांची मागणी देखील वाढली. कॉग्रेसकडून राज्यभरात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या १० सभांची मागणी करण्यात आलीय. तर, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची वणवण आहे. अशोक चव्हाण सोडल्यास काँग्रेसकडे राज ठाकरे आणि धनंजय मुंडे यांच्या तोडीचे वक्ते सध्या तरी नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडून मुंडे आणि ठाकरे यांच्या सभांची मागणी सुरू आहे. महाआघाडीत राज ठाकरे यांना घेण्यासाठी विरोध करणाऱ्या काँग्रेसचे नेतेच राज ठाकरेंच्या सभांची मागणी करत आहेत. राज ठाकरे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली असून आपण भाजपला पाडण्यासाठी सभा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता धनंजय मुंडे देखील राज्यात सभा घेण्यासाठी सक्रीय होणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी मुंडे यांनी बीड जिल्हा पिंजून काढलाय. आता काँग्रेसकडून दहा जागांवर धनंजय मुंडे यांच्या सभांची मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय. यापैकी यवतमाळ-वाशीम, हिंगोली, वर्धा आणि नांदेडमध्ये मुंडे यांनी आधीच सभा घेतल्या आहेत.
लोकसभा मतदार संघात परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भा....
अधिक वाचा