By
PRIYANKA BAGAL | प्रकाशित:
एप्रिल 11, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झालीय. देशात मजबूत सरकार यावं,यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावतआहेत. 17 व्या लोकसभा निवणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात आज विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान होत आहे.नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. तर, आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि आईंसह मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपुरातील धरमपेठ मतदान केंद्राव मुख्यमंञ्यांनी सहकुटुंब मतदान केले. त्यावेळी बोलतना मजबूत सरकारसाठी मतदान करत असल्याचं त म्हणाले. तसेच, सर्वांना मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केले आहे.