ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाराणसीत प्रियंका गांधी विरुध्द नरेंद्र मोदी या सामन्याला अखेर पूर्णविराम

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाराणसीत प्रियंका गांधी विरुध्द नरेंद्र मोदी या सामन्याला अखेर पूर्णविराम

शहर : nOIDA

उत्तर प्रदेशतील वाराणसीमधील लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी दिली. सोनिया गांधी यांची कन्या आणि राहुल गांधी यांची बहीण म्हणून अमेठी व रायबरेली या मतदारसंघांमध्ये प्रियंका गांधी यांनी आजवर काँग्रेसचा प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेश पूर्व म्हणजेच पूर्वांचलमध्ये त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत. विशेष म्हणजे पूर्वांचलमधून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे देखील निवडून येतात.
काँग्रेस प्रियंका गांधी यांना थेट मोदींविरोधात उमेदवारी देणार, अशी चर्चा रंगली होती.  मार्च महिन्यात प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केला होता. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी विनंती काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. यावर प्रियंका गांधी यांनी ‘वाराणसीतून निवडणूक का लढवू नये?’ असा प्रतिप्रश्न केला आणि या चर्चेला बळ मिळाले होते. उमेदवारीचा निर्णय राहुल गांधीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
अखेर गुरुवारी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोदी विरुद्ध प्रियंका या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अजय राय हे भूमिहार समाजातील नेते आहेत. 2014 मधील निवडणुकीत वाराणसीत नरेंद्र मोदी, अजय राय आणि अरविंद केजरीवाल अशी तिरंगी लढत होती. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

मागे

राजकारणासाठी मैत्री गमावू नका असं सांगणाऱ्या मिञांचा फोटो व्हायरल...
राजकारणासाठी मैत्री गमावू नका असं सांगणाऱ्या मिञांचा फोटो व्हायरल...

आता देशात राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे समर....

अधिक वाचा

पुढे  

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण
अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अर....

Read more