By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
जम्मू-काश्मीरमधील 370कलम हटवल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानने आता भारतात निर्माण झालेल्या वस्तूंच्या भारतीय कलाकार असलेल्या जाहिरातीवर बंदी घातली आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ओथरिटीने एक परिपत्रक प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे. टीव्हीवरती भारतीय कलाकार पाहताना पाकिस्तानातील जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. असे यात म्हटले आहे.
डेटॉल, सर्फ एक्सेल, सन सिल्कसहितनी अनेक कंपनीच्या जाहीरातीवर बंदी घालण्यात आली आहे. बालाकोट हल्ल्यानंतरी पाकमध्ये भारतीय सिनेमा आणि जाहिरातींवर निर्बंध आणले होते. भारत-पाकिस्तान समझोता एक्सप्रेस दिल्ली लाहोर बस सेवा बंद केली असून आंतरराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या मिठाईची देवाणघेवाणही बंद केली आहे
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यात्रांच्या माध्यमातून जनतेशी संपर्क ....
अधिक वाचा