By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापू लागलंय. रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. यामध्ये बोलताना मोदी यांनी राजीव गांधी यांना पुन्हा लक्ष्य केले. जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सुट्ट्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली त्याबाबत एका हिंदी न्यूज चॅनेलने एक बातमी प्रसारीत केली आहे. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालविण्यासाठी केला होता. त्यावेळीही राजीव गांधी यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडा....
अधिक वाचा