By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई- नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी संध्याकाळी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद मणिपूर, आसाममध्ये दिसण्यास सुरुवात झाली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. सध्या तिथली परिस्थिती बिघडली असून तणावाचं वातावरण आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. तर राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यातील आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी राजीनामा दिला आहे.
This Bill is against the religious pluralism of India. I request all justice loving people to oppose the bill in a democratic manner. It runs against the very basic feature of the Constitution. @ndtvindia@IndianExpress #CitizenshipAmendmentBill2019 pic.twitter.com/1ljyxp585B
— Abdur Rahman (@AbdurRahman_IPS) December 11, 2019
अब्दुल रहमान यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या धार्मिक बहुलतेविरोधात असल्याचे रहमान यांनी सांगितले. सर्व न्यायप्रेमींनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आयपीएस अधिकारी रहमान यांनी आपल्या ट्विटमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. नागरिकत्वाच्या विधेयकाच्या समर्थनासाठी गृहमंत्री देत असलेला तर्क चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले.
During the passage of the Bill, wrong facts, misleadingly information, wrong logic were produced by the HM. History was distorted. The idea behind the bill is to stoke fear in Muslims and divide the nation.
— Abdur Rahman (@AbdurRahman_IPS) December 10, 2019
We condemn#CitizenshipAmendmentBill
दरम्यान, बुधवारी राज्यसभेतही या विधेयकाला मंजुरी मिळाली. मतदानावेळी शिवसेनेने सभात्याग केला. विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विधेयकाविरोधात १०५ मते पडली. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या द....
अधिक वाचा