ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2020 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

शहर : मुंबई

ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे.

नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे.

नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी (सुधार सेवा) बदली झाली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार कृष्ण प्रकाश सांभाळणार आहेत. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरती सिंह यांची बदली झाली आहे.

मिलिंद भारंबे यांची मुंबईत गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार आता अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण विशेष पथक) म्हणून पदभार स्वीकारतील. तर नागपूरचे पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) म्हणून रुजू होतील.

विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश निघाले.

मागे

पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण
पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने &lsqu....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता जनतेशी संवाद साधणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणा....

Read more