By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. 'लोकमत' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता, असे देशमुख यांनी सांगितले.
मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर चर्चा करून हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळले. यानंतर महाविकासआघाडी सरकारकडून तातडीने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
हे फेरबदल करताना भाजपच्या जवळच्या अधिकार्यांना कमी महत्त्वाच्या जागेवर बदली देण्यात आली, तर सरकारच्या मर्जीतील अधिकार्यांना चांगली जबाबदारी देण्यात आली. मुंबईतही अनेक मराठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकावरील गंडांतर तुर्तास टळल्याचे सांगितले जाते. देवेन भारती, एम. एम. रानडे, निशित मिश्रा, सुनील फुलारी, संजय कुमार बावीस्कर, मनोज कुमार शर्मा, महादेव तांबाडे, संदीप बिष्णोई यातील काही अधिकार्यांची भाजपशी जवळीक असल्याची चर्चा होती. या अधिकाऱ्यांना नियुक्त्या न देता प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर स्वतंत्र ....
अधिक वाचा