By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रचार करण्यासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. आपण केलेल्या विकासकामांचाही उल्लेख केला जातो. शिवसेना नेते आणि महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी वापरलेल्या जाहिरातीवर कोकणच्या विकासाचा म्हणून चक्क आयर्लंडमधील फोटो छापल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करुन दाखवलं म्हणणार्या शिवसेनेच्या विनायक राऊतांनी आता छापून दाखवलं असं म्हणता येईल.
शिवसेना-भाजप-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून लोकसभेच्या रिंगणात आहेत. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून पोस्टर्स छापण्यात आली आहेत. त्या पोस्टर्सवर प्रगत कोकण शांत कोकण अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. मात्र, या टॅगलाईनसोबत देण्यात आलेला फोटो हा कोकणातील रस्त्यांचा नसून आयर्लंडमधील असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे विकासाच्या नावावर शिवसेना नेत्याकडूनही खोटंनाटं छापण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
शरद पवार यांची सभा तब्बल 2 तास उशिराने सुरू झाल्याने त्यांच्या सभेतून लोक....
अधिक वाचा