ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सत्तेत राहून आमच्या नेत्यांवर टीका करणं मान्य नाही - देवेंद्र फडणवीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सत्तेत राहून आमच्या नेत्यांवर टीका करणं मान्य नाही - देवेंद्र फडणवीस

शहर : मुंबई

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्राच्या जनतेने ५ वर्ष सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांचे, सर्व अधिकारी, माझे सहकारी तसेच आमच्या सोबत असलेला आमचा मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राचं सरकार आम्ही पारदर्शीपणे चालवलं. अनेक संकटांचा सामना आम्ही केला. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं.'

'शिवसेनेची पहिल्या दिवशीच ही मानसिकता तयार झाली असावी. पवार साहेबांनी विरोधात बसण्याची भूमिका मांडली आहे. आम्ही सातत्याने चर्चेचा प्रयत्न केला. पण राष्ट्रवादी-काँग्रेससोबत चर्चेच धोरण शिवसेनेने स्विकारली. त्यांच्या आजुबाजुचे लोकं ज्या प्रकारे वक्तव्य करत आहे त्यांने माध्यमात जागा मिळेल पण सरकार नाही बनत. उत्तर द्यायची उत्तम क्षमता आमच्याकडे आहे. पण आम्ही ते करणार नाही.''काही लोकांनी ज्या प्रकारे वक्तव्य केली आहेत ती मनाला पटणारी नाहीत. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीय आहेत. २०१४ मध्ये ही आम्ही विरोधात लढलो पण उद्धवजी आणि बाळासाहेंबाविरोधात काहीही वक्तव्य केलं नाही. पण शिवसेनेने मोदींवर खालच्या दर्जाची वक्तव्य केली.'

'सरकारमध्ये राहून त्यांच्याच मोठ्या नेत्यावर टीका करणं आम्हाला मान्य नाही. धोरणाच्या ऐवजी व्यक्तींवर बोलणं आम्हाला जास्त आढळलं. जगाने मोदींचं नेतृत्व स्विकारलं. पण मित्रपक्षाने अशी टीका करणं आमच्या मनाला लागली. सोबत राहणार असून अशा प्रकारची टीका आणि शब्द कसे वापरायचे याबाबत ही चर्चा आधी झाली पाहिजे.'

मागे

सरकार अस्तित्वात न आल्यास काय हाेईल?
सरकार अस्तित्वात न आल्यास काय हाेईल?

आज विधानसभेची मुदत संपतेय. ताेपर्यंत सरकार अस्तित्वात न आल्यास काय हाेईल?&n....

अधिक वाचा

पुढे  

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली - उद्धव ठाकरे
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ....

Read more