ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 05:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन

शहर : delhi

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. त्यांनी तीनदा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांच्या निधनानंतर बिहारमध्ये तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. जगन्नाथ मिश्रा यांचा बिहारमध्ये काँग्रेस पक्ष वाढविण्यात मोठा वाटा होता. 1975 मध्ये ते बिहारचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 1977 पर्यंत ते या पदावर होते. पुन्हा 1980 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर तीन वर्षे ते या पदावर राहिले. मिश्रा यांनी अवघ्या तीन महिन्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. बिहारमधील दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख होती. सध्या ते जेडियूचे सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला.

मागे

बीएसएनएलचे 2 अधिकारी निलंबित
बीएसएनएलचे 2 अधिकारी निलंबित

जम्मू-काश्मीरमध्ये 4 ऑगस्ट रोजी इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली ह....

अधिक वाचा

पुढे  

22 ऑगस्ट ठाणे बंदचा मनसेचा इशारा
22 ऑगस्ट ठाणे बंदचा मनसेचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने संभाव्य चौकशीकरिता बोलावल्यास ठाणे बंद ....

Read more