ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर अस्मानी संकट; कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 30, 2019 01:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर अस्मानी संकट; कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त

शहर : along

आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे पक्ष प्रमुख जगनमोहन रेड्डी आज मुख्यमंत्रपदाची शपथ घेणार होते. कार्यक्रम स्थळावर जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, बुधवारी रात्री आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामध्ये कार्यक्रम स्थळच उद्ध्वस्त झाले आहे. जगनमोहन रेड्डी हे आज दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी शपथ घेणार आहेत. त्यांच्या पक्षाने 175 पैकी 151 जागांवर विजय मिळविला आहे. तर लोकसभेसाठी 25 पैकी 22 जागांवर खासदार निवडून आले आहेत. रेड्डी यांच्या शपथविधीसाठी राज्यपाल नरसिंह राव बुधवारी दुपारीत हैदराबादला पोहोचले आहेत.

मात्र, बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे त्यांच्या शपथविधीचे कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त झाले आहे. पेंडॉल उडून गेला असून ठिकठिकाणी लावलेले बॅनरही फाटले आहेत. तसेच सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रेड्डी हे शपथविधी पुढे ढकलतात की बंदिस्त हॉलमध्ये घेतात याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

                

मागे

मोदीपर्वाची नवी सुरुवात; महात्मा गांधी आणि अटलजींच्या समाधीचे घेतले दर्शन
मोदीपर्वाची नवी सुरुवात; महात्मा गांधी आणि अटलजींच्या समाधीचे घेतले दर्शन

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर गुरुवारी नरेंद्र मोदी दिल्लीत दुसऱ्यांदा पं....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला
काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल ....

Read more