ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचा सुरुंग, 11 जागांवर मिळवला विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचा सुरुंग, 11 जागांवर मिळवला विजय

शहर : जळगाव

जामनेरमध्ये भाजच्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खातं उघडलं आहे. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वाकोदमध्ये राष्टवादीने खातं उघडलं आहे. तर एकूण अकरा जागा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्ष विरहीत मानली जात असली तरी, जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रियेनंतर राजकीय पक्षांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचे द्वंद्व रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोना काळात होत असलेली ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असणार आहे. ग्रामीण भागात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी तशी मोर्चेबांधणी देखील केली. आता काही तासातच या निवडणुकीचे चित्र निकालातून स्पष्ट होणार असल्याने नेतेमंडळींची घालमेल वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात नेमकं काय चित्र असेल? याची उत्सुकता मतदारांप्रमाणे राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा रंगला सामना

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ आहे. तर भाजप विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडत आहे. राज्यस्तरावरील याच राजकीय मोर्चेबांधणीचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रुपाने ग्रामीण भागात पाहायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष म्हणून नाही तर गावकी-भावकीच्या माध्यमातून लढली जाते. असे असले तरी जळगावात मात्र सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत एकमेकांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना प्रत्येक ठिकाणी रंगल्याचे दिसून आले. आता निकालानंतरच कोणता पक्ष वरचढ आहे, हे कळणार आहे.

मागे

मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!
मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आह....

अधिक वाचा

पुढे  

मालवणमध्ये वैभव नाईकांना धक्का; नितेश राणेंनी गड राखले!
मालवणमध्ये वैभव नाईकांना धक्का; नितेश राणेंनी गड राखले!

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालवण ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बस....

Read more