ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानसभा निवडणुकीला गालबोट : जालन्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानसभा निवडणुकीला गालबोट : जालन्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये  हाणामारी

शहर : मुंबई

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागलं आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. जामखेडमधल्या मतदान केंद्र आणि वर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या हाणामारीत राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण करण्यात आली.

या घटनेत जामखेड गावच्या उपसरपंचासह पोलिंग एजंट गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अंबड येथील रुग्णालयात हलवन्यात आलंय. जामखेड हे गाव बदनापूर मतदारसंघात येतं. भाजपच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तू इकडे पोलिंग एजंट म्हणून का काम करतोस? या कारणावरून मारहाण केल्याचा आहे. तर दुसरीकडे सोलापूरच्या करमाळ्यात शिंदे आणि पाटील अशा दोन गटांत मतदारकेंद्रामध्येच हाणामारी झाली आहे. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांमध्ये बोगस मतदानावरून वाद झाला आहे

 

मागे

राज्यात दुपारी १ पर्यंत  फक्त २९ टक्के मतदान
राज्यात दुपारी १ पर्यंत फक्त २९ टक्के मतदान

राज्यात मागील ६ तासापासून फक्त २९ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ ते दुपारी १ प....

अधिक वाचा

पुढे  

निवडणुकीवर 30 हजार कोटींचा सट्टा
निवडणुकीवर 30 हजार कोटींचा सट्टा

मुंबई - महाराष्ट्रात आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सट्टा बाजारात 30 ....

Read more