ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुरक्षा दलाकडून 'अलकायदा'चा दहशतवादी झाकिर मूसाला कंठस्नान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 24, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुरक्षा दलाकडून 'अलकायदा'चा दहशतवादी झाकिर मूसाला कंठस्नान

शहर : देश

देशात गुरुवारी एकीकडे लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती तर दुसरीकडे मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा केला. गुरुवारी सुरक्षा दलानं पुलवामाच्या त्रालमध्ये दहशतवादी संघटना 'अलकायदा'चा भाग असणाऱ्या काश्मीरमधील 'अन्सार गजवत उल हिंद'चा चीफ कमांडर झाकिर मूसा याला कंठस्नान घातलं. शुक्रवारी सकाळी झाकिर मूसाचा मृतदेह चकमक स्थळावरून ताब्यात घेण्यात आला. या ठिकाणावरून एक एके ४७ रायफल आणि एक रॉकेट लॉन्चरही ताब्यात घेण्यात आलंय. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला या भागात दहशतवादी झाकिर मूसा याच्यासहीत इतर दहशतवादी लपून बसल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर दक्षिण काश्मीर भागाला सुरक्षा दलानं वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. याच दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. सुरक्षा दलानंही त्याला योग्य प्रत्यूत्तर दिलं. या चकमकीत झाकिर मूसा ठार झाला. 

शोपिया, पुलवामा, अवंतिपोरा आणि श्रीनगर या भागांत मूसाच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. सावधानता बाळगत जम्मू - काश्मीर पोलिसांनी पुलवामा, अवंतिपोरा, श्रीनगर, अनंतनाग आणि बडगाममध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवलीय. या भागातील इंटरनेट सेवाही काही काळासाठी स्थगित करण्यात आलीय. 

 

 

मागे

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांची जोडी लालकृष्ण अडवाणींच्या भेटीला
भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांची जोडी लालकृष्ण अडवाणींच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या देदिप्यमान यशानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरें....

अधिक वाचा

पुढे  

फॉर्मात आहेत असं वाटत असतानाही राहुल गांधींचा पराभव का?
फॉर्मात आहेत असं वाटत असतानाही राहुल गांधींचा पराभव का?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला. काँग्रेस अध्यक्....

Read more