ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जमशेदपूर, भिलाईप्रमाणे विदर्भात पोलाद प्रकल्प : मुख्यमंत्री

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 07:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जमशेदपूर, भिलाईप्रमाणे विदर्भात पोलाद प्रकल्प : मुख्यमंत्री

शहर : मुंबई

             विदर्भातील खनिज साठ्याचा योग्यरित्या अद्याप उपयोग करण्यात आलेला नाही, म्हणून आपली ही संपत्ती अशीच भूर्गभात पडून आहे.  हे लक्षात घेऊन जमशेदपूर व भिलाईप्रमाणे पूर्व विदर्भात एक मोठा पोलाद प्रकल्प आम्ही आणणार आहोत, यामुळे रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी सांगितले आहे.


         अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहातील कामकाज संपल्यानंतर पत्रकारपरिषदेत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते व अर्थमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची देखील उपस्थिती होती.


          यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतल्या, यामध्ये सर्वप्रकारचे प्रश्न मार्गी लावण्याच्यादृष्टीने आदेश दिलेले आहेत. मला खात्री आहे की जी कामं खोळंबली होती, ती सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. 
 

मागे

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात आता मुख्यमंत्री कार्यालय
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात आता मुख्यमंत्री कार्यालय

            नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य विधिमंडळाच्....

अधिक वाचा

पुढे  

नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र?
नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीच्या सरकारन....

Read more