By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 04:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आगामी विधानसभा निवडनुकीची शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेंतृत्वात शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर ' जन आशीर्वाद यात्रा' काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ' आदित्य संवाद' नंतर शिवसेनेच्यावतीने ही यात्रा म्हणजे दुसर महत्वच पाऊल आहे.
"ज्यांनी मत दिले आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत, तर ज्यांनी नाही दिली त्यांची मन जिंकायची आहेत." या मथळ्याखाली या आशीर्वाद यात्रेच आयोजन करण्यात आल आहे. शुक्रवारपासून आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौर्यावर निघणार असून घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो .त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा त्याच्यासाठी महत्वाचा असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याधीच महाराष्ट्रात विकास यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. ऑगस्ट महिन्यात फडणवीस 'फिर एक बार शिवशाही सरकार' ही विकास यात्रा काढणार आहेत. भाजप आणि शिवसेना दोघेही महाराष्ट्राच्या दौर्यावर निघनार असल्याने या दोन्ही यात्रा राजकीय महत्त्व प्राप्त झाल आहे.
कर्नाटकातील कॉंग्रेस जेडीस च्या सरकारवर संकट ओढले असताना सरकारच्या मदतीस....
अधिक वाचा